Monday, December 20, 2021

लाडु सम्राट

बटाटा वडा खावा तर येथेच नाही तर खाऊ नये. अशी ख्याती असलेले हे "लाडु सम्राट" नामक उपहारगृह नव्या देखण्या रुपात नटुन परत एकदा जातीच्या खव्वय्यांची क्षुधाशांती करण्यासाठी, त्यांना तॄप्त करण्यासाठी सज्ज झाले आहे.

ऐन मराठी वस्तीत, वेल, निदान कोणे एके काळी संपुर्ण मराठी माणसे रहात असलेल्या या मराठी गाभ्यात, लालबाग मधे, बटाटा वडा, वडा उसळ, मिसळ, साबुदाणा वडा , कोथिंबीर वडी, अळुवडी, थालीपिठ, पोहे, खरवस खाण्यासाठी लाडुसम्राट मधे जाणॆ हे मराठी माणसांनी अजीबात टाळु नये. 

टाळलत तर बटाटा वडा कसा असु शकतो, कसा असावा हे कधीच कळनार नाही.

खातच रहाल, खातच रहाल. खातच रहाल.

Ladu Samrat. Near Ganesh gulli Lalbaug




No comments: