अखेरीस आज तडफडणारा जीव शांत झाला, जिव्हेची तृप्ती झाली, आत्मा समाधान पावला आणि आधीच लंबोदर असलेले राजाभाऊ काहीसे अधिकच लंबोदर होवुन राहिले.
किती वाट बघायला लागली, एक साधी गोष्ट पण ती मिळवायला किती प्रतिक्षा करायला लागली ? राजाभाऊ जेव्हा जेव्हा जागतीक स्तरावरचे मानांकन मिळालेल्या मिसळीचा "आस्वाद" घ्यायला जायचे तेव्हा तेव्हा बाहेर प्रतिक्षेत असलेली गर्दी बघुन राजाभाऊ हबकुन जायचे व माघारी फिरायचे. पुढे "प्रकाश" मधे जायचे. भुलेल्या पोटी अन्नाची वाट बघत रहाणे हे फार क्लेषकारक असल्यामुळे. आज हे दुष्टचक्र संपायचे होते. सेनाभवनवरुन पुढे जातांना राजाभाऊंनी "आस्वाद" च्या बाहेर गर्दी किती आहे ह्याची टेहाळणी केली. कमी गर्दी दिसली तेव्हाच ठरले होते आज येथेच. काम आटोपले आणि मग काय काळेकाकुं सोबत काळेकाका "आस्वाद" मधे , मिसळ आणि पोळाउसळ खायला.
आत शिरायला, टॆबल मिळायला फारशी वाट बघायला जरी लागली नाही तरी पण नशिबी जो विलंब व्हायचा होता तो होवुन गेला. अशी जागा मिळाली की टेबल आणि खुर्ची यांच्यामधे राजाभाऊंचे पोट आडवे आले. दोघांच्या मधे शिरता आले तरी बसता नाही आले. मग योग्य ते टेबल मिळायला अंमळ थांबावे लागले.
शेवटी खरवस.
टॉमेटो सार. पोळाउसळ आणि ज्या मिसळीला पुरस्कार मिळाला ती मिसळ, दही मिसळ.
मिसळ आस्वाद
No comments:
Post a Comment