Monday, December 20, 2021

गोविंदा

आज राजाभाऊंच्या घरी मस्तपैकी उसळपावचा बेत होता. उसळ रटारट शिजत जवळजवळ तयार झाली होती, पावही आणुन झाले होते, त्यात परत जान्हवीताईंच्या घरातील सर्वजणी कश्या छानश्या नटलेल्या होत्या त्यांना पाहून डोळेही निवले होते. बस आता प्रतिक्षा होती ती  आतुन केव्हा जेवणास बोलवणं येते त्याची.

पण भगवान श्रीकृष्णाला हे मान्य नव्हते. हरे  क्रिस्ना. क्रिस्ना, हरे हरे क्रिस्ना. हरे रामा हरे क्रिस्ना क्रिस्ना. 

जणु भगवंतांनी सुदाम्याच्या हाती हरेकृष्णाजींना बोलवणं धाडले. राजाभाऊ आज सात्विक भोजन करण्यासाठी, प्रसाद सेवन करण्यासाठी तुम्ही माझ्या मंदिरात "







गोविंदा" मधे या. आता प्रत्यक्ष भगवंतांनी दिलेले आमंत्रण कसे नाकारायचे ? आणि आपल्या नशिबी कधी कुठुनचे अ्न्नग्रहण करण्याचे लिहिलेले असते हे केवळ नियतीने लिहिलेले असते ह्यावर राजाभाऊंचा विश्वास. मुलाच्या परममित्राने त्यांना कुठेतरी बाहेर जेवायला जावु असे सुचवले. राजाभाऊ काय एका पायावर तयार.

मग काय, आता उसळ उद्या सकाळी नास्त्याला खाऊ असे गोडगोड बोलत त्यांनी कोणाचे तरी मन वळवले आणि ते पोचले गिरगाव चौपाटीजवळच्या इस्कॉन मंदिरामधल्या "गोविंदा" मधे भोजन ग्रहण करण्यासी.

बेत आपला नेहमीचाच. दम आलु काश्मिरी. (जेवण मागवण्यामधे राजाभाऊंना फारसा वाव नसतो, त्यांना मुकाट्याने जे समोर येते ते अन्न खावे लागते ) प्रेमापोटी आता एकदा एखादी भाजी आवडली तर प्रत्येकवेळी तीच का मागवायला हवी असे विचारायची सोय पण नाही. 

पण काही म्हणा ही भाजी मस्तच असते. चविष्ट. कांदा लसुण वर्जीत. 

जेवल्यानंतर मुकाट्याने खाली मान घालुन घरी परततील तर ते राजाभाऊ कसले ? त्यात परत गेले कित्येक दिवस त्यांना "बादशहा" मधे जावुन फालुदा पिण्याची तीव्र ओढ लागलेली. सोबतच्या कुणाला नॅचरल आईसक्रिम मधे जायचे होते, कोणाला चौपाटीवरची मलई कुल्फी खायची होती, मधेच खुद्द राजाभाऊंना के.रुस्तुमकडचे  आईसक्रिम खाण्याची तिव्र इच्छा झाली होती ( जी कोणीतरी हाणुन पाडली )

बादशहाचा रॉयल फालुदा. एकदम बढीया.

No comments: