खावु का नको खावु ? खावु का ? का नको ? नको ? का जरासे चाखुन पाहुया ?आपण मत्स्याहार करत नसले तरी काय झाले ? आयुष्यभर कितीतरी केलेले पण मोडत आलोय.
खायचे झाले तर काय खाऊ ? आणि कोणत्या कोळीणबाईच्या हातचे खावु ?
मात्साहरींसाठी मेजवानी असलेल्या ह्या प्रदर्शनात शाकाहारी असलेल्या राजाभाऊंच्याने मोह आवरणॆ कठीण झाले खरे, पण आवरायलाच लागला.
एकमात्र नक्की. गरमागरम मऊसुत, पांढरी शुभ्र, मोठाली तांदळाची भाकरी. ती खायचीच खायची. मग कोरडी का होईना. असं ठरवत असतांना समोर आली ती चवळीची भाजी. मग काय.
आडवा हात चालवला तो अटक मटक चवळी चटक वर.
"महामत्स्य महोत्सव " बांद्रा - कुर्ला कॉम्लेक्स
No comments:
Post a Comment