Saturday, December 25, 2021

उपवास

 आता उपवासासाठी फराळी मधे एवढे पदार्थ करणार हे कळल्यावर जर का "शेंगदाण्याचा लाडु नाही का करणार " 

असा प्रश्न जर का राजाभाऊंनी विचारला असता तर आज त्यांना नक्कीच संन्यास घेवुन हिमालयात जाण्याची वेळ आली असती.


जरी शेंगदाण्याचा लाडु खाण्याची झालेली इच्छा मनात दाबुन ठेवली.  अकस्मात दुपारी जेवतांना तो समोर आला. समोर बसलेल्या गृहस्थांच्या डब्यात.


मग काय. 


निर्लज्यम सदा सुखी. 


"आजच सकाळी मला ह्या लाडवाची आठवण झाली होती " असं म्हणत राजाभाऊंनी त्यांच्याकडे अप्रत्यक्षपणे मागितला.


तसंच दिवसाच्या व रात्रीच्या महाफराळाच्या यादीत नेमके नारळाची चोय भरुन तुपात तळलेले राजेळी केळी राहिले होते.

अचानक रात्री उपवास सोडतांना ते ध्यानीमनी नसतांना समोर आले. 

अच्छा लगता है !


No comments: