बंद पडलेले "बाय द वे"
गावदेवीमधल्या सेवासदन मधे असलेल्या " बाय द वे " ह्या रेस्टॉंरंट मधे चविष्ट, चांगले जेवण मिळत असते तर ?
अलीकडच्या काळात तेथे जाणॆ झालेले नाही , त्यामुळे जेवण कसे असेल ते सांगता येत नाही. पण एक मात्र नक्कीच , येथले वातावरण खुप मस्त आहे. कोणालातरी बरोबर घेवुन शांतपणे गप्पा मारत, एकामेकाच्या सहवासाचे सुख घेत जेवायचे असेल तर ह्या सारखी दुसरी जागा मुंबईमधे नसावी. गर्दी अजिबात नसते आणि जेवतांना मॅनर्स न पाळणारे , मोठमोठ्याने आरडाओरडा करत मजा करणारी माणसं येथे कधीच येत नाहीत. उत्तम अंतर्गत सजावट. फालतुचा कोलाहाल नाही, कलकलाट नाही. निव्वळ शांतता. कदाचित संपुर्ण रेस्टॉंरंट मधे फक्त तुम्हीच असु शकता. कधीतरी येथे मिळणारे पारसी पद्धतीचे जेवण जेवतांना माणसं दिसतात खरी पण बऱ्याच वेळा ते रिकामेच दिसते. ह्यांच्या मेन्युमधे तसा निवडीला फारसा वाव नाही. पदार्थ अगदी मोजकेच मिळतात , त्यामुळे खाण्याबाबतीत कधीकधी निराशा होवु शकते.
काही वर्षापुर्वी जेव्हा " बाय द वे " सुरु झाले तेव्हा राजाभाऊ तेथे जेवायला अनेक वेळा गेलेले, अर्थात काळेकाकुंबरोबरच. पण नंतर ते जाणे थांबलेच. आज नानाचौकातुन येताना जाणवले आपण बरेच वर्षे येथे आलेलो नाही.
जुनी पोस्ट.
हे रेस्टॉरंट बंद पडले आहे.
No comments:
Post a Comment