Monday, December 20, 2021

गोविंदा

 राजाभाऊ तसं बघायला गेलं तर फारसे  इस्कॉनचे  भक्त आहेत असे म्हणता येणार नाही. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी "गोविंदा" "गोविंदा" "गोविंदा हा जप करुच नये. आणि त्यात परत अलिकडे हा जप जरा जास्तीच वाढला आहे हे मात्र बरीक खरे.

आपण गिरगाव चौपाटीच्या इस्कॉन मंदिरातल्या "गोविंदा" ह्या उपहारगृहामधे जेव्हा जेव्हा जेवायला जातो तेव्हा तेव्हा डोळ्याला झापडं लावुन जातो की काय असा विचार मनात आल्यानंतर मग त्यामुळॆ आज राजाभाऊंना आपण काय जेवलो ह्यापेक्षा आपण काय बघितले हे जास्त महत्वाचे वाटायला लागले.

"गोविंदा" मधे जेवायला जायचे, जेवुन बाहेर आलं की गाडीत बसुन घरी जायचे, उगीच कशाला इकडेतिकडे फिरायचे ? हा त्यांचा शिरस्ता काही कारणे आज मोडला. आणि मग त्यामुळॆ मंदिराच्या आवारात खाद्यपदार्थांचा दर रविवारी स्टॉल लागतो हा राजाभाऊंना शोध लागला. तसं उपहारगृहात शिरतांना बाहेर त्यांचा काउंटर आहे खरा, पण कधीच तेथे काय मिळते ही साधी चौकशी सुद्धा केली नव्हती.

मग काय, जेवणाच्या मंदिराच्या आवारातील स्टॉलवर मग ते गरमागरम टॉमेटो सुप. कोणासाठी तरी वडापाव अणि पिझ्झा. काकुंसाठी गुलाब जामुन, काळाजामुन, चमचम, रोशोगुल्ला पार्सल.

ह्या उपहारगृहातील जेवणाचा प्रसाद दाखवला जात असल्यामुळ शुद्ध सात्विक जेवण आहे. येथे आपले नेहमीचेच जेवण राजाभाऊ जेवले. दम आलु काश्मिरी आणि कुलचे. 

खरं तर आज सिझलर्स खाण्याची खुप इच्छा होती जी कोणीतरी हाणुन पाडली.

No comments: