रमाकांत. खोपोली. एक आठवण. बटाटा वड्याची.
यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग बनायचा होता. जुन्या मुंबई-पुणे महामार्गाने जाताना बोरघाट लागतो. सतत उभा चढ, त्यात परत रस्ताही एकपदरी. वहानांचे इंजीन तापायचे, अनेक वहाने बंद पडायची. तासनतास वहातुक कोंडी होत असे.
मग बोरघाटातुन चढण्याआधी इंजीन थंड करायला वहानचालक बोरघाटाच्या पायथ्याशी असलेल्या खोपोलीतल्या "रमांकात" मधे बटाटा वडा खाण्यासाठी थांबत. खाणे व गाडीला आराम दोन्ही गोष्टी साध्य व्हायच्या.
कालांतराने मग एक्सप्रेस वे बनला, बोरघाटातुन प्रवास बंद झाला, रमाकांतचा धंदा बसला, उतरती कळा लागली, रया साफ गेली.
असेच काही वर्षापुर्वी राजाभाऊ जुन्या जमान्याच्या खातीर वाकडी वाट करुन "रमाकांत" मधे बटाटा वडा खायल गेले आणि पांबलेला बटाटा वड्याची चव घेत स्वत:लाच शिव्या देत बाहेर पडले.
ह्या "रमाकांत" चे पुढे काय झाले माहिती नाही.
No comments:
Post a Comment