मुंबईमधे इडली-डोसा खायला जावे म्हणजे डोळ्यासमोर येते ते माटुंगा. एकापेक्षा एक सरस अशी येथे दाक्षिणात्य उपहारगृह आहेत.
कॅफे मद्रासला खवय्यांची नेहमीच पसंदी असते. केव्हाही जा, सकाळ,दुपार, संध्याकाळ म्हणु नका सतत येथे गर्दी असते.
पहाटे बाहेरगावी जायला निघाले की पहिला थांबा हा कॅफे मद्रास मधे असायचा. इडली, डोसा हाणायचा मग वरती फिल्टर कापी प्याल्यानंतर मग पुढच्या प्रवासाला लागायचे.
आणि हो एक राहिलेच. खाणे सुरु करण्याआधी एक ग्लास रसम पिणे असायचे.
तुप्पा डोसा, पिस्सारुटु डोसा, रागी डोसा ह्या डोश्यांची ओळख् झाली ती येथेच्.
No comments:
Post a Comment