Monday, December 20, 2021

ज्वालामुखी, रामा नायक आणि जित्याची खोड मेल्याशिवाय



ज्वालामुखी, रामा नायक आणि जित्याची खोड मेल्याशिवाय

काय गरज होती राजाभाऊंना आपल्या बायकोला भडकवण्याची.

दोन दिवस लेक्चर दे दे दिले.

नवऱ्याचे वजन शंभरी पार करुन पुढे घोडदौड करु लागले आहे ते लक्षात घेता सकाळी घरी राजाभाऊंना तिने श्रीखंडपुरी (श्रीखंड आणि ते देखिल "आदर्श" चे ) जरासुद्धा चाखुन दिली नाही. कंट्रोल म्हणजे कंट्रोल.

पण राजाभाऊ.

संध्याकाळी त्यांनी जरा बायको कडे थोडीशी सुट मागितली. 

"चल माटुंग्याला खायला जावु "

तिला वाटले नीर डोसा हा खाईल. तेवढे चालेल. पण. राजाभाऊंच्या मनात वेगळेच होते. 

रामा नायक कडॆ रविवारी पोळ्या नसतात फक्त पुऱ्या असतात हे त्यांना चांगले ठावुक असतांना देखिल ते तिला घेवुन रामा नायक कडॆ जबरदस्तीने , तिची इच्छा नसतांना पण घेवुन गेले. 

पुऱ्या नको खावुस या सांगण्याकडॆ दुर्लक्ष करुन त्यांनी तिच्या संतापाला बाहेर पडायला जागा करुन दिली.

कुछ तो शरम करो, राजाभाऊ, कुछ तो सोचो.

दह्याची वाटी व ताकाचा ग्लास समोर आणुन ठेवणे हा एक संकेत जेवण वाढणाऱ्यासाठी. ह्यांच्या कडुन कुपन गोळा केले आहे. ह्यांना ताट वाढायला हरकत नाही.

तिला वाटलं असेल आपला नवरा फक्त सांबारभात, रसमभात, दहीभात , डाळ भातात समाधान मानेल , निदान आज पासुन तरी.

आपल्या नवऱ्याचे गुण कसे आहेत हे ठावुक असतांना देखिल काहीसे भाबडेपण.

आणि मग पुरी फुगली. 

ताटात पण आणि .....................

मग राजाभाऊंने घाबरुन " पायसम " खाण्याचे टाळले.




No comments: