Monday, December 20, 2021

खिचडी सम्राट - श्री, बृंदावन भवन

खिचडी सम्राट - श्री, बृंदावन भवन - शुध्द शाकाहारी भोजन

आज राजाभाऊंना काहीसे हटके खाण्याची इच्छा झाली, डालबाटी, चुरमा लाडु, गरमागरम डाल ढोकली, आणि वर खिचडी खाण्याची हुक्की आली, त्यांच्या  मनात, त्यांच्या डोळयासमोर एकमेव उपहारगृह आले,  ते म्हणजे भुलेश्वर येथील "खिचडी सम्राट " मग ते तेथे जावुन धडकले.  

खिचडी सम्राट , या ठिकाणी मिळणाऱ्या शुध्द शाकाहारी , कांदा लसुण व्यर्जीत ( आता कदाचीत कांदालसुण जेवणात टाकत असावेत, बरोबर ठावुक नाही ) , जवळजवळ दहा प्रकारच्या मुगाच्या डाळीच्या खिचडी मुळॆ हे नाव पडले.  मसाला खिचडी, हरीयाली खिचडी, ड्राय फ्रुट खिचडी , मकाई खिचडी काय मागवाल ते  खरे. 

तर सुरवात केली ती डालबाटीनी.

पण पहिल्याच डिश मधे राजाभाऊ आटपले.  त्यांना वाटले होते , येतील लहानश्या बाट्या. त्या काय आपण सहजच खावु. पण त्या भल्यामोठाल्या तुपाने बरबटलेल्या, तुपात बुडलेल्या बाट्या,  बाट्या कुस्करुन त्यावर रिती केलेली डाळ, हे सारे काही त्यांच्याचाने संपवेना, ( कसे काय संपेल, संध्याकाळी खाल्लेले छोले व कुलचे, त्यांचे काय  )  

पुर्वी पाच सहा वेळा ते येथे जेवले आहेत. कधी मकाई रोटी बरोबर शेवटमाटार, तर कधी आलु मटार. पण त्यांचे पोट जास्त रमले आहे ते डालढोकळीतच.

आज त्यांच्या बाजुला बसलेल्या गृहस्थांनी " पापड मेथीका साग " मागवला होता. त्यांच्या एकदा मनात आले की त्यांच्याकडे हा पदार्थ चाखायला मागायचा.

परत पुन्हा केव्हातरी






No comments: