"राजकीय फायद्यापेक्षा अमेरीकन नागरीकांच्या दैनंदीन प्रश्नाच्या सोडवणुकीला त्यांच प्राधान्य असते " - हे वर्णन वाचले "उद्याचा नेता " या बराक ओबामा यांच्या वरील म.टा मधे श्री. सतीश कामत यांनी लिहीलेल्या उत्तम लेखामधे.
सद्यस्थितीत कोणीतरी हे गुण आपल्या नेत्यांच्या निदर्शनास आणुन दयायला हवेत. सदानकदा केवळ भावनीक मुद्दे हाती घेवुन केवळ भावनांच्या प्रश्नावर आपले राजकारण करत येनकेन प्रकारे सत्ता संपादन करणॆ हा मार्ग न चोखंदळता, फक्त बेरजेचेच राजकारण करुनही सर्वोच्च पदाच्या जवळ जाता येते हे बराक ओबामा दाखवुन देत आहेत.
आपल्याकडल्याही सर्व पंतप्रधानपदासाठी उत्सुक, उतावळ्या आपल्या नेत्यांसाठी देखील या अमेरीकन पद्धतीच्या धर्तीवर उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरु करायला हवी. त्यासाठी गरजेचे आहे अमेरीका, ब्रिटन प्रमाणे केवळ दोन राजकीय पक्ष असलेली प्रणाली.
जर तुम्ही आमचे, आमच्या देशाचे नेतॄत्व करु इच्छीत असाल तर त्या पदासाठी आपण कसे व केवढे समर्थ, सक्षम, आहोत, आपण देशाला कोणती दिशा देणार आहात, भविष्यासाठी आपल्याकडे कोणत्या योजना आहेत ते तसे देशाला आपण या सुरवातीच्या चर्चेद्वारे सांगीतले पाहीजे, पटवुन दिले पाहीजे.
सुजाण मतदारांनीही केवळ धर्म, जात, प्रांत, भाषा, यांच्या आधारावर केवळ भावनेचे राजकारण करीत, केवळ हाच सत्तासंपादनाचा मार्ग हेच गॄहीत धरणाऱ्या आपल्या नेत्यांची निवड करतांना, त्यांच्या मागे जातांना आधी थोडा तरी विचार करायला हवा.
No comments:
Post a Comment