Wednesday, February 20, 2008

दिवसाढवळ्या शुद्ध दिशाभुल

मोरुची बायको सक्काळी सक्काळी मोरुस बोलली, मोरु ऊठ, मोरु ऊठतोस ना रे , ऊठ ना रे ,अस काय ?
हा येवढा मधाळ स्वर ? सवय नसल्यामुळे मोरु बावचळुन गेला, मनात शंकेची पाल चुकचुकायला लागली. सावधान मोरु, सावध रहा जेव्हा माणसे अचानक गोड बोलु लागतात, चांगले वागु लागतात तेव्हा नक्कीच काहीतरी त्यांच्या मनात शिजत असते . दिवस वैऱ्याचा आहे.

अरे जरा इंटरनेट सुरु करतोस कारे ? तीच्या मारी ! हीच हीच ती दिवसरात्र नुसती कोकलत असते , किती वेळ या संगणकाला चिकटुन असतो म्हणुन. पण बायकोला नाही म्हणायला मुळातच अंगात धाडस असायला लागते, मोरु तर कणाहीन.

हे बघ यांची http://www.travelocity.co.in/ जाहीरात आली आहे, मुंबई दिल्ली विमान प्रवास फक्त रु. १७५०.०० मधे, चटफट, फटाफट आपली चौघांची तिकीटे बुक करुन टाक बघु. नाहीतर फुल्ल होतील.
आज्ञाधारक मोरुनी तत्काळ माहीतीजालात या साईट वर टिकीटाचे दर पाहीले. या खालील आकड्यात त्याला रु. १७५०.०० कोठेच दिसेना.

Direct
Rs 5,313 , Rs 5,386, Rs 6,408 ,Rs 8,276,Rs 9,584
One stop
Rs 5,724

मग त्यानी त्या कंपनीला दुरध्वनी लावला, आधी * दाबा, मग १ दाबा मग, ए सारे सोपस्कार पुर्ण झाल्यावर एका युवतीने फोन उचलला. मी म्हटले बाईग आम्ही निघालो आहोत राजधानी सर करायला, रु. १७५०.०० मधे चार टिकीट लवकर द्या.

थांबा हं बघते काय उपलब्ध आहेत ती . या या फ्लाईट्ची आहेत , यांचा दर तुम्हाला सर्व मिळुन जवळजवळ रुपये २६,०००.०० पडतील, सर्व डिस्काउंट वजा जाता.

अहो पण माझ्या हिशोबाने फक्त रु. १४,०००.०० व्हायला हवेत रु, १७५० च्या दराने.

त्याच काय आहे, शोधावे लागेल , तुम्ही चार एकदम टिकीटे बुक न करता वेगवेगळी घ्या म्हणजे थोडी फार स्वस्त पडतील. पण रु. १७५० च्या दरात नाही. आणी ती देखील एका फ्लाईट् मधे नाही.

कठीण आहे बुवा, बायको एका फ्लाईट्ने , नवरा दुसऱ्या, मुलगा तिसऱ्या

थोडक्यात सांगायचे तर जाहीरात म्हटल्या प्रमाणे रु, १७५० च्या दराने ते ऐकही टिकीट देवु शकत नाहीत .
या अश्या फसव्या जाहीराती करतातच कशाला ?

तात्पर्य शेवटी मोरुच्या बायकोच्या नशीबी विमान प्रवास नाही ,ट्रेनचाच प्रवास लिहीला आहे.

No comments: