Wednesday, February 20, 2008

मी पण विकावु आहे ! कुणी घेता का हो ?


मी पण विकावु आहे. काय विचार ?
पोराला सांगुन सांगुन दमलो, अरे अभ्यासाची पुस्तके सोड, बॅट हातात घे, क्रीकेट खेळ दाताच्या कण्या केल्या, साम दाम दंड भेद सर्व प्रयोग करुन झाले, पण ऐकेल तर शप्पथ.


आता मग मलाच मैदानात उतरावे लागणार आहे. जन्म भर कारकुनी करुन राहलोय त्या मुळे महिना अखेरच्या तारखेची वाट बघणॆ नशिबी जे काही लागलेले आहे त्यातुन सुटका पाहीजे असेल तर माळ्या वर धुळ खात पडलेली बॅट खाली काढण्यावाचुन पर्याय नाही अस वाटायला लागलय.


मला कोणाला विकत घ्यायचे आहे का बोला ? बोली लावायला सुरवात करा. तसा थोडाफार क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, गल्लीत क्रिकेट चांगला खेळत होतो. आतापण काही काळा पुरती का होईना बॅट हाती धरु शकतो, वेळप्रसंग पडल्यास चेंडु मागे अवजड की बोजड शरीर घेवुन धावुही शकतो.


त्यांना करोडो रुपयाच्या बोल्या लावुन विकत घेतले जाते. माझी काही तेवढी मागणी नाही. थोडक्यात पटण्यासारखे आहे.


मग काय विचार ?



सकाळ - क्रिकेटच्या "श्रीमंती'चे नवे पर्वमुंबई, ता. १९ - सद्‌गृहस्थांचा खेळ अशी ओळख असणाऱ्या क्रिकेट या खेळाची आता उद्यापासून "श्रीमंत' अशी नवी ओळख क्रिकेटच नव्हे; तर उद्योग आणि बॉलीवूडसह क्षेत्रालाही होईल. बहुचर्चित आणि कोट्यवधी डॉलरची उलाढाल असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या आठ संघांची उद्या निवड होईल.निवड होण्यापेक्षा आठ संघांचे फ्रेंचाईस आपला संघ अधिक बलवान करण्यासाठी नामवंत क्रिकेटपटू "विकत' घेणार आहेत.

2 comments:

Vaishali Hinge said...

mast...:). बोलि प्रकार मला तरी कळला नाहिइ काय आहे ते..?
हरेक्रिश्नाजी, माझ्या लेकाने ऐकले बर bat हातात घेण्याचे!!! या वर्षी त्याची Leicestureshire district cricket under 13 साठी निवड झाली त्याचे नुकतेच District council कडुन training सुरु झाले आहे. त्याला club ला सोडायला गेलो तेव्हा..
पुर्वि Leicestureshire county कडुन खेळलेल्या खेळाडुंची यादी बघितली.. त्यात अनिल कुबळेचा फोटो बघितला. आणि तीथे आता माझा लेक खेळणार हे बघुन फ़ार छान वाटले..

HAREKRISHNAJI said...

Great. That's a great news. Pl
convey my hearty congrats to The Little Champ.

Recently there was auction of cricket players for the Indian Premier League in Mumbai.
This means
MS Dhoni gets - Rs.6.03 crores
Sachin Rs.4.50 cr
Andrew Symonds Rs.5.42 cr
Brett Lee Rs.3.61 cr
Harbhajan singh Rs.3.51 and

ANIL KUMBLE RS.2.00 CRORES.