Tuesday, February 12, 2008

त्या दोघीजणी

नमस्कार, मी मिसेस क्ष. बोलतेय, या बॅंकेच्या त्या ब्रांच मधुन, हो ना, आज मी पुण्यात नाही, मुंबईला कामासाठी गेले होते.

या वाक्याने सुरु झालेली मोबाईल वरील संभाषणे मुंबईत सुरु झालेली थेट पुणे स्थानक येई पर्यंत सुरु होती. जागा - डेक्कन क्वीन चा वातानुकुलीत खुर्चीयानातील डब्बा. दिवसभरातील राहीलेले कार्यालयातील कामे या प्रवासात पुरी करायचा बाईंनी चंग बांधला होता.

माणसे मोबाईल फोन वर किती अमर्यादीत बोलतात ? व आपले संभाषण आजुबाजुच्या सर्वांना ऐकवत. किती त्रासदायक असते हे. आधीच मी रात्रभर झोपलो नव्हतो, म्हटले गाडीत झोप घेवु, त्या साठी जास्तीचे पैसे मोजले, पण !!

मध्यंतरी पुणॆ-मुंबई वोल्वो बस च्या प्रवासाचे वर्णन "गंध कुणाचा "http://aatalyaasahitmaanoos.blogspot.com/ या एका बॉग वर वाचले होतो त्याच आठवण होईल असा हा प्रसंग.

असाच एक बस प्रवास ठाणॆ-अणजुरचा. वेळ भर दुपारच, देवदर्शन करायला आम्ही निघालेलो, नेमक्या कोणत्या बस स्थानकावरुन ही गाडी सुटते हे शोधाशोध करण्यात बराच वेळ दवडलेला, परत आल्यावर चांगले उपहारगॄह शोधुन जेवु, म्हणुन हट्टाने उपाशी राहीलेले आम्ही दोघे.

बस पकडली , अचानक मस्तकशुळ उठला, तीव्र वास सहन होईना, समोर बसलेल्या बाईंनी अतिशय तीव्र वासाचे तेल आपल्या मस्तकी चोपड चोपड चोपडले होते. त्यात बरेच दिवस केस धुतलेले नसावेत असे माझ्या बायकोचे मत पडले.

हे तेल बनवणाऱ्यांना व वापरणाऱ्यांच्या आवडीला माझा नमस्कार.

No comments: