Monday, October 05, 2009

मी म्हणजे कोण ?

काही माणसे कशी आपल्या असलेल्या ओळखींमुळे उन्मत्त होतात, अहंकारी होतात , त्या ओळखीचा कसा गैरवापर करतात या संबधी एका वाचकाने दै.सकाळच्या "मु्क्‍तपीठ’ मधे लेख लिहिला आहे.
काल रात्री अश्याच एका माणसाचे गर्वीष्ट रुप पाहिले. दुसऱ्याला तुच्छ मानत स्वःताला फार महान समजणाऱ्या या सदगॄहस्थाने राजाभाऊंच्या एका सुंदर रात्रीची वाट लावली.
कालची रात्र साजरी करायला ते पुण्यामधे एका हॉटेल मधे बुफे खायला गेले. पुर्वी ते येथे गेले असल्यामुळे येथला कर्मचारीवर्ग त्यांच्या ओळखीचा. कालचे वातावरण आल्हाददायक होते, पाऊस नुकताच पडुन गेल्याने हवेत गारवा होता, रात्र सुरेल होती. मस्त पैकी छानसे जेवण जेवत , गप्पा मारतमारत रात्र रंगत चालली होती, मधेच स्वःत शेफनी येवुन त्यांची विचारपुस केली. जेवण अगदी मस्तच होते. बुफे जसा हवा तस्साच.
पण रसाचा भंग करण्यासाठी त्यांच्या बाजुला एक कुटुंब येवुन बसले. त्या गॄहस्थानी बियरच्या टेंपरेचरवरुन जो शहाणपणा शिकवायला सुरवात केली तेव्हाच खरतर राजाभाऊंनी आपली जागा बदलायला हवी होती. त्याचा घसा म्हणे खराब होता.
राजाभाऊंना भेटायला शेफ बाहेर आले होते तेव्हा त्या विद्वान गॄहस्थांनी त्याला मेनु मधे नसणारा कोणतातरी सॉस बनवायला सांगितला, व त्यांने तो कर्टसी म्हणुन बनवुन पाठवला देखील.
मग जेवण झाल्यावर राजाभाऊंसाठी हॉटॆल तर्फे त्यांच्या वाढदिवसाचे निम्मित्ते बर्थडे केक दिला गेला, कापतांना ते शेफ परत बाहेर आले. राजाभाऊंसाठी सारे कसे मंत्रवत होते, भारावलेले वातावरण.
त्या शेफना बघुन "त्या"चे पित्त खवळले.

"हा सॉस असा बनवतात काय ? किती तिखट केला आहे ? जगात असा कुठेच बनवला जात नाही, ऑस्टेलिया पासुन अमेरीकेपर्यंत, मी कोण आहे माहिती आहे का ? मी आत्ता तुमच्या अमुक तमुकशी , (त्या हॉटेलच्या उच्चपदस्थ थोरामोठयांची दोन चार नावे घेतली ) मोबाइल वरती बोलत होतो, तुझे नाव सांग, मी त्यांना सांगुन तुझी आत्ता नोकरी घालवतो, तुला रस्तावर आणतो, मला तु तिखट खायला घातलेस काय ? जी फायरींग सुरु झाली ती थांबायचे नाव नाही.
राजाभाऊंना त्याचे खुप वाईट वाटले, एका क्षणापुर्वी ते सर्व त्यांच्याशी अगदी आनंदात बोलत होते, त्या हॉटॆलच्या, तिथल्या जेवणाच्या केलेल्या तारीफने खुश होत होते आणि दुसरयाच क्षणी त्यांना जमिनीवर आदळले गेले.
कसाबसा राजाभाऊंनी त्यांचा संताप आवरला.

कोणाची तरी ओळख सांगुन हा सर्वांचा नोकरी घालवण्याच्या धमक्या देतो म्हणजे काय एखादी गोष्ट आवडली नाही तर त्याची तक्रार जरुर करावी पण वैयत्तीकरित्या कोणाला धमक्या कशासाठी द्याव्यात ?

1 comment:

Narendra prabhu said...

ही अशी विघ्नसंतोशी माणसं क्लेश झाला की खुपच आनंदीत होतात. दुसर्या माणसाचा पाणउतारा करून अशांना चांगली झोप लागते. मला आलेला अनुभाव लवकरच ब्लॉगवर टाकतो.