Friday, April 02, 2010

तर मा. मुख्यमंत्रांचे टायमींग चुकले तर

त्याची वेळ चुकली म्हणायची. त्यांनी अभिव्यक्‍तीस्वातंत्र वर असलेल्या परिसंवादाऐवजी मंगेश पाडगावकरांच्या कार्यक्रमाला यायला हवे होते.

"प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते , तुमचे आमचे सेम असते "

साऱ्यांना कसे प्रेमाचे भरते येवुन राहिले होते. अश्या वातावरणात कोणाला जहाल बोलावेसे वाटॆल ?

आता या कार्यक्रमामधे मंगेश पाडगावकरांचा काहीसा तोल सुटला होता खरा,  पाडगावकर आजोबांशी लहान मुलांच्या गप्पा असे हे कार्यक्रमाचे स्वरुप आहे, पुढे लहान लहान मुले बसलेली आहेत याचा त्यांना अनेकदा विसर पडला हे खरे, मग वयात आलेल्या मुलीचे वर्णन " All of sudden everything " वगैरे.  काहीसे ते वहावत गेले. होता है होता है.

पण  वहावत गेलेल्या पत्रकारांच्या टिका ऐकण्यापेक्षा ही फुले अंगावर घेणॆ किती तरी पटीने बरं की.


No comments: