कोणे एके काळी "सिंहासन" चित्रपटात, कादंबरीत डिकास्टाच्या तोंडाचे हे वाक्य ऐकुन जीव थरारला होता. एका राज्याच्या प्रमुखाला, सर्वात शक्तीशाली व्यक्तीला , मुख्यमंत्राला हे तोंडावर सांगण्याची ही हिम्मत ? केवढे जबरदस्त वाक्य ते वाटले होते त्या काळी.
आणि आता, काळ बदलला. साहित्य संमेलनात आपला नियोजीत कार्यक्रम बदलुन आदल्या दिवशी मुख्यमंत्री आले खरे , पण त्याचा त्यांना नक्कीच पश्चाताप झाला असणार. ही पत्रकार मंडळी, लेखक मंडळी त्यांना शालजोडीतले तर जावुंद्या, उघड उघड हाण हाण हाणात होती. मुख्यमंत्रांना तोंड दाबुन बुक्काचा मार. एकाचा तर चक्क तोल सुटला होता, आपल्याला नक्की काय बोलायचे आहे याचे भान न रहाता ते गृहस्थ मधेच त्यांची स्तुती करत होते, मधेच शिव्या घालत होते.
अभिव्यक्तीस्वातंत्रावर चर्चा असली तरी येवढे स्वातंत्र काही खरे नव्हे. जेव्हा खरोखरच बोलायची वेळ असते तेव्हा बोललेच जाते असे नाही.
राजकारणी माणसांना शिव्या देण्याची जणु फॅशनच होवुन गेली आहे.
2 comments:
माध्यमे आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर भाषणे देणारी मंडळी मध्यमवर्गातून आलेली असल्याने, आपल्या सगळ्या दुखण्यांना राजकारणी जबाबदार असल्याचा त्यांचा समज असतो. शिवाय राजकारण्यांना शिव्या घालण्याने प्रतिक्रिया येण्याची शक्यताही कमी असते. काही लोक फक्त मार खाण्यासाठीच भाषणबाजी करत असतात.
मुख्यमंत्र्यांच्या नावाने खडे फोडणारी माध्यमे, संमेलनानंतरच्या दोन दिवसांत पुण्यात दोन कार्यक्रमांमध्ये अमिताभने एकदाही महाराष्ट्राची अथवा मराठीची आठवण काढली नाही, तेव्हा का मूग गिळून गप्प होती?
हो पण आपले मुख्यमंत्री त्याच लायकीचे आहेत. फॅशन आणायला तेच जबाबदार आहेत.
Post a Comment