Sunday, June 12, 2011

कांचन - यवत जवळ

कांचन.

काय राजाभाऊ अगदी मणी"कांचन"योग जुळुन आला म्हणायचा.

छानसे खाद्यगृह. शाकाहारी. मस्त पावसाळी माहोल, रम्य संध्याकाळ,  सुंदर अंतर्गत सजावट, अतिथ्यशील कर्मचारीवर्ग व स्वःत मालक. चविष्ट जेवण. सजवुन समोर आणलेले अन्न. 

आतापर्यंत हे नजरेतुन सुटलेच कसे याचा राहुन राहुन विचार. किती वेळा आपण पुणॆ-सोलापुर हमरस्तावर प्रवास केलेला. अगदी भुकेल्या पोटी वहान हाकलेले, हायवेवर कुठे काय चांगले जेवायला मिळणारच नाही हा विचार करत. 

भुलेश्वर वरुन परततांना स्नेहींनी हायवेवर एखाद्या धाब्यावर जेवु करत केलेली फर्माईश. राजाभाऊ त्या कल्पनेत फारसे उत्साही नसलेले. जेव्हा का त्यांनी "कांचन" मधे पाऊल ठेवले तेव्हा त्यांचा पुर्वग्रह मावळलेला. 






यवत पासुन पुण्याला येतांना हे "कांचन " लागते. अगदी सायंकाळी मुद्दामुन पुण्याहुन येथे जेवायला जाण्यासाठी उत्तम ठिकाण. दुपारी मिळणारी महाराष्ट्रीय भोजनाची थाळी . सायंकाळ पर्यंत मिळणारे खाद्यपदार्थ. रात्री पंजाबी व चायनीज जेवण. 

राजाभाऊ आणि त्यांच्या बायकोचे एकमत झाले. आयुष्यातील फार दुर्मिळ घटना. नाहीतर नवऱ्याला एखादी गोष्ट पसंद आली की त्याला नाक मुरडायचा हा यांच्या स्वभाव. 

परत एखाद्या रात्री येथे जेवायला यायचेच यायचे, मुलाला घेवुन. 

No comments: