मुंबई मधे जन्मलेल्या शेफ फॉईड कार्डोझ यांना America’s much-watched “Top Chef Masters” contest मधे USD 100,000 चे प्रथम पारितोषक मिळाले.
त्यांनी बनवलेला खाद्यपदार्थ होता
"उपमा"
तिने बनवलेला खाद्यपदार्थ होता
"उपमा"
तोच उपमा मस्तपैकी खोबरेबिबरे पेरलेला.
तिलासुद्धा बक्षिस मिळाले.
राजाभाऊंनी आणि तिच्या मुला कडुन.
" तुला कळत कसं नाही ?
तुला दुसरे काय बनवता येत नाही ?
तुला माहिती नाही आम्हाला उपमा आवडत नाही ते ?
जगात एवढ्या डिश असतांना तुला काय फक्त उपमाच बनवता येतो ?
दुसरे काय बनवायला शिकवले नाही काय ? इ.इ,इ, "
झक मारले आणि आपण ह्यांच्या साठी नास्ता बनवतो असे नक्कीच तिला वाटले असणार ?
1 comment:
तेल तापलं, मोहरी तडकली ,
मिरच्या ऐटीत हल्ला करून
कढीपात्याला बोलावू लागल्या,
आणि
न्यूयोर्क चे आलं, कांदे ,गाजरं आणि मटार
यांचे थाटामाटात
भाजलेल्या रव्या संग आगमन झाले.....
ग्लोव्स घातलेल्या हातांनी नाजूकपणे
बनवलेला
हा एक लाख डोल्लार्स चा उपमा .......तालीया, तालीया !
इकडे
एका सुट्टीच्या आळसाव्लेल्या सकाळी
बाहेर पावसाची मंद रिपरिप
आणि आत पदर खोचून
एकीकडे तेलात
मोहरी हिंगाची मिर्च्यांशी कुजबुज
ऐकत ,
बांगड्यांच्या तालात खरवडलेल खोब्र,
खमंग रव्याचा सुवास ,
कांदे कापून मग पुसलेले डोळे ,
गाजर,मटाराने भूषवलेले राष्ट्रीय रंग ,
आणि
एका आईने ,
झाकण ठेउन , हात पुसून ,
सोडलेला खोचलेला पदर .....
दही लोणच्याबरोबर
खोबरं कोथिम्बिरीने नटलेला पदार्थ ;
त्यांच्या घरी कधी कळेल
कि हाच तो
मिलियन डोल्लर उपमा .......फेटे उडवा , फेटे उडवा ,
कार्दोझा,जरा वाहिनींकडून शिक !
Post a Comment