केव्हा केव्हा सरकारला कठोर पावले उचलुन आपल्या अस्तिवाची जाणीव करुन द्यायला लागते. अगदी तसचं. केव्हा तरी राजाभाऊंना आपलेही स्वतंत्र अस्तित्व जाणवुन द्यायला लागते, मग सर्वांची पावले मुकाट्याने साधे, घरगुती जेवण जेवायला जाण्यासाठी वळु लागतात.
आणि हे "अतिथी डायनींग हॉल " मधले हे जेवण व त्यातला आमटीभात पाहिल्यावर कोणता मुलगा "मी जेवणार नाही, मी उपाशी राहीलो तरी चालेल " हा बालहट्ट करत राहिल ?
( सरकारनेही ह्या पासुन काही तरी शिकावे. कोणी आमरण उपोषणाला बसला रे बसला की त्याच्यासमोर गरमागरम, वाफाळलेला मऊसुत आमटीभात ठेवावा किंवा ठेवावा वरणभात सोबत गोडयालिंबाच्या लोणच्याची एखादी फोड आणि वरती घरगुती शुद्ध तुपाची धार सोडलेली.
काय कोणाची बिशाद आहे आपल्या हटवादी स्वभावाला चिकटुन रहाण्याची ? )
पुण्यामधे घर होण्याआधी "नंदनवन " मधे रहाणे आणि अतिथीत जेवणे. तेव्हा पटवर्धन हे डायनींग हॉल चालवत असतं. राजाभाऊंच्या बायकोच्या मते तेव्हा जेवणाची मजा काय और होती.
पटवर्धन आत्ता ते कुठे गेले आहेत देव जाणे. त्यांच्या नावाचा बोर्ड अलकासमोरील एका बंद दुकानावर दिसतो खरा.
2 comments:
tumhi kadhalele photos khup-khup bolatat....!!!:)
Thanks.
Post a Comment