Thursday, June 09, 2011

देवा तुझ्या दर्शनाला मी आलोय

1 comment:

Ugich Konitari said...

आयुष्याच्या कितीतरी
डोंगर माथ्यांवर
मनाच्या देवळात घंटा वाजतात .....
"अरे, जरा जपून "... ची घंटा ,
"दहा अंक मोज रे , मग बोल " ची घंटा,
"खोटं बोलू नकोस "....ची घंटा ,
मग कधी कधी
हर्षभराने वाजवलेली घंटा,
यशाने हुरळून जाउन वाजवलेली घंटा ,
कधी
देवाला आळवून पाणावलेल्या डोळ्यांनी वाजवलेली घंटा ....
आणि
एखाद्या पावसाळ्यातील ढगाळलेल्या
संध्याकाळी ,
दुखरे गुढगे सांभाळत
खरे डोंगर चढून ,
नातवाला उंच करून
"जय बाप्पा "
म्हणून वाजवलेली खरी घंटा ...
आणि गाभार्यातला तो म्हणतो ,
"आयुष्य हे असा असतं...."