Wednesday, June 15, 2011

काय चाललय ?


1 comment:

Ugich Konitari said...

कणखर आयुष्यातल्या
ओबडधोबड आठवणी ;
मोठ्या दगड धोंड्यांशी दिलेली टक्कर ,
प्रयत्नांच्या परिश्रमांनी गुळगुळीत झालेले,
पण पुन्हा पुन्हा आडवे येणारे ,
मधेच मातीला मोकळीक देणारे,
आणि
काही एका जागी डोक्यावरून पाणी जाउन
बिनाकाराचे, केस पांढरे झालेले;
सगळ्यांना पार करून ,
तो स्वस्थपणे जरा बसतो .
जोरात येणार्या लाटा ,
अचानक विखरून पायाशी अंतर्धान पावतात ,
उगीचच कुणा दगडांवर खोटं खोटं फुस्कारतात ,
आणि
आयुष्यात खूप टक्केटोणपे खालालेला
तो
दूर कुठे तरी दृष्टी लाउन
पैलतीर शोधात राहतो ....