Monday, June 06, 2011

राजाभाऊंचे उपोषण

आपल्या नेत्याला साथ देण्यासाठी राजाभाऊंनी प्राणांतिक उपोषणला बसायचा ठाम निश्चय आपल्या मनाशी केला.  आता उपोषण करायचे म्हणजे करायचेच.

आणि मग त्यांचे उपोषण सुरु झाले. आपल्या न्याय मागण्या पुर्ण झाल्या शिवाय आता माघार नाही.

स्थळ. हुतात्मा चौक, मुंबई.
साल - १९८०-८२ असावे.

उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर पहिला.

उपोषणाला सुरवात झाली. खुप उत्साही वाटत होतं. आपण समाजासाठी हा त्याग करीत आहोत, ही भावना किती सुखद.
आता रिकाम्या पोटी उपोषणाला बसणे नको करुन भरपुर , भरपुर बकासुरी नाष्टा केलेला.  न जाणो परत केव्हा पोटात अन्न जाईल ?

उपोषणाची सुरवात मोठी दमदार झालेली.

उपोषणाचा पहिला दिवस. प्रहर दुसरा.

अजुन राजाभाऊ आपल्या निश्चयावर ठाम आहेत.

दिवस पहिला, प्रहर तिसरा.

आता मागे हटणे नाही, प्राण गेले तरी चालेल.

प्रहर चौथा.

उन्हं वाढत चालली आहेत. पोटातले कावळे फारच वेडॆपिसे झालेले. कसेबसे त्यांना पकडुन ठेवलेले. जरा आडवं व्हाव काय ?

संध्याकाळचे पाच.

प्रकृती पार खालावलीय वाटत. सलाइनबिलाइन लावावी लागते की काय ?

अजुन पर्यंत कसे कोणी फिरकत नाही ? सरकार दरबारची माणसे गेली कुठे ? आणि वार्ताहार , पत्रकार ? कोणीच कसं अजुन पर्यंत दखल घ्यायला आलेले नाही ? या रे या, कुणी तरी मुसंबीचा रस घेवुन या.

संध्याकाळचे सहा वाजले.

राजाभाऊ नुकतेच उघडलेले" सुविधा " जवळच आहे.

एक दिवसाचे साखळी उपोषण समाप्त.

नेत्यानी मात्र उपोषण पुढे सुरु ठेवलेले.

मागण्या काही मान्य झाल्या नाही. गुळमुळीत आश्वासने मात्र पदरात पडली.

फी वाढ व्ह्यायची ती  झालीच.

No comments: