काही काही वाक्य बराच काळ लक्षात रहातात.
सारे चर्चेचे गुर्हाळ जे साध्य करु शकले नसते ते सचिन कुंडलकरांच्या एका वाक्याने साध्य व्हावे आणि गहाण ठेवलेले डोके त्वरीत जागेवर यावे, भुरळ घातले गेलेले डोळे खाडकन उघडावेत.
" भगव्या वेशातील एका करोडपती योगगुरुंकडून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणा आपण समजुन घेणार असू, तर आपल्यात आणि मुल्ला-मौलावींच्या इशाऱ्याने चालणाऱ्या देशांमधे काहीही फरक उरणार नाही "
3 comments:
सर महत्वाच्या मुद्या, की कपड्यांचा रंग.
इथे लोकांची दिशाभूल बरेच आहेत...
> भगव्या वेशातील एका करोडपती योगगुरुंकडून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणा ...
>----
व्यक्तीचा वेष हा निकष इथे नसावा. विवेकानन्दांबद्दल कुंडलकर असं बोलले असते? विवेकानन्द किंवा हा रामदेव बाबा यांच्या या विषयातल्या योग्यतेबद्दल मला काही माहिती नाही. पण (तथाकथित) अर्थशास्त्रतज्ञांच्या हाती कारभार असलेल्या अमेरिका-युरोप मधल्या भल्या-मोठ्या संस्था कशा गडगडल्या हा इतिहास ताज़ा आहे.
ऊर्जानिर्मितीवर फार भर देणारी, फार खर्च करायला लावणारी जीवनशैली टाळा, असा गांधीजी-विनोबांचा सल्ला होता. आता ठेंगडी-सुदर्शनजी ही मंडळी तेच सांगताहेत. यांपैकी कै ठेंगडी सोडून इतर कोणाचा अर्थशास्त्राचा फार अभ्यास नसावा. तरीही एका उपज़त शहाणपणामुळे आणि कळकळीमुळे या लोकांना खास नज़र असते. *ज़र* रामदेव बाबा तोच सल्ला देत असेल तर काय हरकत आहे?
अर्थशास्त्र न शिकलेले वसंतदादा पाटील, शरद पवार हे लोक सुशिक्षित सी ए लोकांना 'कर कसा चुकवावा' याचे धडे देत असावेत. सूर्योदय-ग्रहण ही माहिती शास्त्रज्ञ ज़से खात्रीशीर सांगतात तशी खात्री या अर्थकारणात मुळातच नाही. याचा अर्थ स्टीफन हॉकिंगसारखे शास्त्रज्ञ मूर्खासारखे बरळत नाहीत, असा नाही. 'बिग बॅंग' पासून विश्वाची उत्पत्ती झाली असं एक मॉडेल म्हणतं म्हणजे ती तशी झाली असेल असं अजिबात नाही. या छोट्याश्या पृथ्वीवर उद्या होणारी त्सुनामी यांना आज़ सांगता येत नाही, गप्पा मात्र दशलक्ष-दशकोटी वर्षांपूर्वी विश्वोत्पत्ती कशी झाली याच्या. मानवी बुद्धीच्या मर्यादेबद्दल वेदकालीन ऋषीमुनींना या नोबेल जिंकणार्यांपेक्षा जास्त माहिती होती. पण शास्त्रज्ञांचा अहंमन्य मूर्खपणा एक स्वतंत्र विषयच होईल.
केवळ कपड्यान वरून एखाद्याची भूधीमत्ता कळू शकते का , महात्मा गांधी कपडे पाहून काळातील का , टिळकांना कपड्या वरून ग्रामीण म्हणायचे का , नोबेल मिळवणारे bose हे कोणते कपडे घालत .
अमेरिके मध्ये तथाकथित बुद्धिमान लोकांच्या बँका बुडाल्या .
जे अर्थाव्यावास्तेमध्ये सद्य चालले आहे ते फार चं चालले आहे का .
Post a Comment