Wednesday, June 01, 2011

आधीच मर्कट तशात मद्य प्याला किंवा माकडाच्या हाती आंब

किंवा या राजाभाऊंच डोस्क फिरलयं. पार वेड लागलयं म्हणायचं. कोणत्या जातीचा घेवु नी कोणता नको. कोणता चाखुन पाहुन नी कोणता नाही ? पायरीचा रस ओरपु की राजापुरीचा ? लंगडा, चौसा, बदामी, तोतापुरी, लालबाग, दशेरी, पायरी, राजापुरी ते हापुस ,काय बोलाल ते  सारे सारे मांडीला मांडी लावुन ज्या नजाकतीत बिराजमान झालेले होते , अहाहा, मनाचा ताबा सुटला, मन धरुन रहाणॆ कठीण झाले,  हे सारे सारे आंबे  पाहुन राजाभाऊ वेडेपिसे झाले. झालेतर झाले त्यात परत ते एकटॆच "फुडहॉल " मधे गेलेले, अटकाव करायला, नवऱ्याच्या लालसेला बांध घालण्याचे काम करणारी बरें झाले सोबत नव्हती. घेतल थोडे थोडे प्रत्येकी.दशेरी पासुन सुरवात झालीयं.

शेवट बहुदा आमच्या गावच्या चोखी आंब्याने करावी म्हणतोय."फुडहॉल " पॅलॅडीयम मॉलमधे जाण्यास एक नवे कारण मिळाले. 

ता.क.-  हे काय एवढेच ?

No comments: