Tuesday, June 14, 2011

चालतच राहते, ती चालतच राहते ....

जेव्हा राजाभाऊंनी हे फोटो काढले तेव्हा त्यांच्या नजर्रसमोर श्री. ४२० मधला नर्गीस व राजकपुरचा पावसातील् सीन होता.

पण तसे झाले नाही.

जेव्हा ही Suranga Date यांनी या फोटोवर रचलेली एक अप्रतिम कविता वाचली तेव्हा जाणवले की या प्रसंगाला आणखीही कंगोरे आहेत-

पायाखाली रखरखीत जमीन ,
काहीतरी उगवल्याचा भास देणारे गवत,
आणि आई पृथ्वी,
निळ्या आभाळाच्या छत्राखाली
थोडा गारवा अनुभवत
संथ पायपीट करते ....
घरातला मिळवता सूर्य
तिला त्याच्या मागे मागे
आणि भोवताली फिरवतो ;
आयुष्यातले ऋतू बदलतात ,
कधी तो तळपतो ,
की कोणाला ग्रहण लागतं,
कधी तो तिचे श्रम ओळखून
ढगामागे तोंड लपवतो ....
पण ती
चालतच राहते, ती चालतच राहते ....





No comments: