Tuesday, April 06, 2010

दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ

थोरला म्हणतो मीच तुमचा रक्षणकर्ता,  राजाभाऊंनी मान डोलावली. खरं आहे. पटले तुमचे. तेवढ्यात धाकटे म्हणाले, तुमच्या कैवाराचा मक्ता मी घेतला आहे, मोठ्यांच्या राज्यात तुमचे काही निभावत  नाहीयं,  राजाभाऊंनी मान डोलावली. बरोबर आहे तुमचे म्हणणे अगदी खरं आहे, पटले मला. थोडक्यात काय तुमचे बरोबर आणि तुमचेही बरोबर, आपण कशाला कोणची बाजु घ्यायची.

पण दोघांमधला धाकटा हुशार हो. आतापर्यंत हे दोघे फक्‍त काळजाला हात घालत होते. 

धाकट्याने आता एकदम पोटापर्यंत धाव  घेण्याचे ठरवले. 

नुसता वडापाव खावुन खावुन किती वर्षे खाणार तुम्ही ? परत त्यात आता त्यातली लसणाची चटणी पण तिखट राहिलेली नाही, जिभेची काय आग होत नाही, मन काही पेटता पेटत नाही,  आता असा हा बिनतोड सवाल विचारल्यावर आणि मग त्यातुन हा असा आता पोटाचाच प्रश्न निर्माण झाल्यावर हे असे तटस्थ रहाणे राजाभाऊंना जड जावु लागले.  

लोण्याचा गोळा मटकावयाला हा बोका पुढे सरसावला आहे .

राज ठाकरे यांनी अंधेराला महाराष्टीय खाद्यमहोत्सव जो आयोजीत केला आहे त्याला ते २४ एप्रिलला जाणार आहेत.

अशी कोलांटीउडी मारणॆ बरे नव्हे हो राजाभाऊ.

2 comments:

Anonymous said...

Enjoyed !! Good One !!

HAREKRISHNAJI said...

जमलय खरं हे बऱ्यापैकी.