गेल्या काही वर्षात आंब्याच्या व्यापाऱ्यांनी, दलालांनी, आणि विक्रेत्यांनी हा सम्राटाचे अवमुल्यन करुन टाकले आहे. पैश्याच्या लोभाने कोवळे फळ लवकर झाडावरुन उतरवणॆ, कॄत्रीम रसायनांचा मारा करुन ते अकाली पिकवणॆ, व काळॆ पडलेले, सुरकुतलेले, न बघवणारे रसहीन, गंधहीन फळ चढ्या दरात अज्ञानी ग्राहकाच्या गळी उतरवणॆ असे प्रकार.
आणि मग या परिस्थितीत असली, रुचकर, चविष्ट, सुवासीक आंबे, बागेतुन थेट ग्राहकांपर्यंत पोचावे यासाठी अनेक ठिकाणी आंबा महोत्सव भरवण्यात येवु लागले.
तीन एक वर्षापुर्वी अशाच एका आंबा महोत्सवात आमची गाढ पडली देवगढच्या सौ. मुग्धा कार्लेकरांशी , आणि उत्तम दर्जाचे, अस्सल, ओरीजनल आंबे खाण्यासाठी शोध घेत रहाण्याचा आमचा प्रवास तेथे संपला. आता इतरत्र कोठेही बेभरवश्याची बोली करण्याचे प्रयोजनच राहीले नाही. जे फळ हवे होते, जसे हवे होते ते मिळाले.
मग आता दरवर्षी मार्च महिना आला की वेध लागतात केव्हा एकदा केव्हा बरे सौ. मुग्धा कार्लेकर मुंबईत आंबे घेवुन येणार याचे.
सौ. मुग्धा कार्लेकरांनी मुंबई मधे चक्क दुकान घेतलय , दादरला, गोडबोले स्टोयरच्या बाजुला, कॅनरा बॅंके समोर, वैद्य रोडवर .
मग काय . छातीत दुखत असतांना त्याकडे दुर्लक्ष करत झाली खरेदी.
आणि आता काय पुढील दोन महिने नुसते मनोसक्त कार्लेकरांच्या आंब्यांचा आस्वाद घेणॆ.
तेव्हा मग
1 comment:
Mi pan jain Sau Karlekar bainkade....
Amba mhanje jeev ki pran!
Chatit ka dukhat hota?!?
Post a Comment