नवसह्याद्री मधला बहरलेला अमलताश एकदा बघुन समाधान न झालेले राजाभाऊ परत दुसऱ्या दिवशी त्याचे डोळे भरभरुन दर्शन घ्यायला गेले, बाजुच्या रस्तावरील नीलमोहर ही बघायचा होता.
सुरवात केली सिंहगड रस्तावरील सारदा मठातुन. मठाच्या आवारातही एक बहावाचे छानसे झाड आहे, ते ही आता बहरु लागलय. त्यांच्या हाती आणखी एक रत्न या मठात लागले. येथे "पॅरेडाईज "ची बरीच झाडॆ आहेत. कालच्याच लोकसत्तामधे त्याचा फोटो आला आहे.
मग राजाराम पुलावरुन स्वारी त्यांच्या मॅडम सवेत नवसह्याद्रीत वळली. वाटॆत त्यांना एका फळवाल्याकडे गुलाबी पेरु मिळाले.
रस्तावरच्या सुरवातीचे पेल्टाफोरम चांगलेच फुलुन आले आहेत. पण कशी निसर्गाची किमया असते . येथे ओळीने तीन बहावाची झाडे आहेत. मधल्या झाडाला आपला बहार आवरता आवरत नाहीत , आणि बाजुचे दोघे ! अजुन ही प्रतिक्षेत आहेत, निसर्ग कधी आपल्यावर जादुची कांडी फिरवतो याची.
या निष्पर्ण , निष्फुली बहाव्याला पाहिल्यानंतर मन जरासे व्यथीत झाले.
त्याला म्हटले " का रे बाबा काय झालयं तुला, का असा उदास ? "
बहावा हळुच डोकावत म्हणाला "धीर धर, भल्या माणसा धीर धर "
No comments:
Post a Comment