Tuesday, April 27, 2010

देशपांडे यांचा श्रीकृष्ण आटा. विलेपार्ले

आपल्या नवऱ्यानी घरी एखादी गोष्ट हौसेने आणली असेल तर त्याचा हिरमोड कसा करायचा हे या बायकांना पक्क माहिती.  

राजाभाऊंना विलेपार्लेच्या भटकंतीत आणखी एक चांगली जागा सापडली.  ( अर्थात या जागेचा संबंध अप्रत्यक्षपणे त्यांच्या भोजनभाऊपणाशी असणार होता ) 

Taste for Life - Enriching every day.  हे वाक्य आपल्या पिशव्यांवर मिरवणाऱ्या  श्रीकृष्ण आटा विकणारे दुकान त्याच्या नजरेत भरले होते. मग एकदा ते घरी जाता जाता त्या दुकानात शिरले व तेथे मिळणारी अनेक प्रकारची पिठे पाहुन ते हरकुन गेले, काय घेऊ नी काय नाही असे त्यांना झाले.  मग भीतभीत त्यांनी तांदळाचे पिठ व गव्हाचा आटा विकत घेतला.

हिरमोड अश्यासाठी की  त्यानंतर त्यांच्या घरी जेव्हा तांदळ्याच्या भाकऱ्या केल्या गेल्या तेव्हा घरातील जुनेच पिठ वापरले गेले.

राजाभाऊ नाराज झाले, त्यांनी आपली नाराजी व्यक्‍त करण्याचे धारीष्ट दाखवले.

अलिकडे त्यांची बायको तशी समजुतदार होत चालली आहे. तिला आपल्या नवऱ्याची नाराजी चक्क समजली.

आज जेव्हा ते देशपांडे यांच्या श्रीकृष्ण आटा मधुन आणलेल्या तांदळाच्या पिठाच्या केलेल्या मऊसुत भाकऱ्या खात होते तेव्हा ती प्रेमानी त्यांना विचारु लागली

" आणखी कोणती पिठे तिथे मिळतात ? आणत जा अधुन मधुन "  


 

2 comments:

हेरंब said...

हा हा.. राजाभाऊ .. मस्तच..

BTW, निषेध !!!

Yogesh said...

मस्तच राजाभाउ!!!