सुर्यास्तापुर्वी भोजन करावयाचे हा एक धर्मसंकेत. ही धर्माज्ञा , हा दण्डक पाळायचे राजाभाऊंनी आज ठरवले.
स्थळ : दुगड भोजनशाळा, श्री.वर्धमान आगम तिर्थ, कात्रज , पुणे.
वेळ - सायंकाळची. पाच वाजुन ४५ मिनिटे.
आजनी वानगी :
पंचकुटी डाल , भात, शाक - मिक्स भाजी, रोटली , खिचीया,
भोजनप्रिय राजाभाऊ कधी, केव्हा , कोठे आणि कसे पोचतील हे सांगणॆ महाकर्मकठिण. फक्त का पोचले हेच ते सांगु शकतील
आगम मंदिरात जेवण फार चांगले मिळते असे ते ऐकुन होते. दुपारी घरी बसुन बसुन कंटाळा आला, मग त्यांना ही ऐकिवात असणारी गोष्ट आठवली. त्यांचा कयास खरा ठरला, येथे छानपैकी साधे , रुचकर, चविष्ट , सात्विक भोजन त्यांना मिळाले.
मस्तपैकी लहानुसे गरमागरम तुपाने भरलेले फुलके, केळी, तोंडली वटाणा आदींची मिश्र भाजी, लाजबाब चव, खिचिया, लोणचे , आणि सोबत गुळाचा खडा, ती विशिष्ट चव असलेल्या डाळीबरोबर.
डाळ, भात आणि गुळाचा खडा. आणखी काय पाहिजे.
आता येथे परत कधीतरी सकाळी जेवायला जायला हवे.
1 comment:
रसिक आहात तुम्ही.. :)
Post a Comment