अफ्रिकेतील जंगल. रोज होते तशी सकाळ झाली. ते लहानुशे, सुंदर चपळ हरिण उठले , त्याला ठावुक होते , त्याला आज सिंहापेक्षा अधिक वेगाने पळायचे आहे नाहीतर त्याची धडगत नाही, त्याचे मरण निश्र्चित आहे.
अफ्रिकेतील जंगल. रोज होते तशी सकाळ झाली. जंगलाचा राजा सिंह जागा झाला. त्याला ठावुक होते आज त्याला त्या चपळ हरिणापेक्षा अधिक वेगाने पळायचे आहे. नाहीतर त्याला व त्याच्या कुटुंबीयांना उपाशी रहावे लागेल.
मुंबईतील जंगल. रोज होते तशी सकाळ झाली. ते राजाभाऊ जागे झाले. त्यांना ठावुक होते आजही आपल्याला पळायचेच आहे, तीच धावपळ करायची आहे नाहीतर ....
कंटाळा आलायं ह्या सर्वाचा. कुठेतरी थांबावसं वाटतयं.
पण .
1 comment:
एवढं धावून कुठे जायचं आहे?
अश्या शर्यती चालल्या आंधळ्यांच्या
तयामागुती धावणे हे ततः किम्?
कुठे जात आम्ही पुढे काय आहे
असा प्रश्न का हो पडे ना ततः किम्?
Post a Comment