Wednesday, December 30, 2009

आई


दै.सकाळमधे दर आठवड्याला एकत्र कुटुंबाचे गोडवे गाणारे लेख येत असतात, सुखी एकत्र कुटुंबांचे फोटो वगैरे.
खरच का हे एकत्र कुटुंबपध्दती चित्र येवढे मधुर असते.

श्रीमंत बापाने एका गरीब पण होतकरु मुलाला आपली मुलगी दिलेली.

त्या मुलाचा कुटुंबकबीला भला मोठा. तो सर्वात मोठा. साऱ्यांचा भार त्याच्या खांद्यावर.

नवऱ्याच्या पाच बहिणी, दोन भाऊ , त्यांची लग्नेकार्ये, त्यांची घडी नीट बसवुन देणे, दोन काका, आईवडील. मग झालेली तीन मुले.
त्यात घरात  लग्न झालेल्या नणदां त्यांच्या जागेच्या अडचणीपायी त्यांच्या नवऱ्यामुलांसकट घरात रहायला आलेल्या .

आयुष्य साधेसरळ सोपे, आनंदी नसते. ...

1 comment:

Gouri said...

मला तर वाटतं की एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काहींनी मर मर मरायचे, आणि त्यांच्या जिवावर बाकीच्यांनी बसून खायचं असंच चित्र जास्त प्रमाणात होतं. घरातल्या कुणालाच हवं ते करायचं स्वातंत्र्य नाही.सगळेच दबलेले. घरातली कर्ती बाई तर कायम कामाच्या डोंगराखाली. एकत्र असण्याचे फायदे नक्कीच होते, पण तोटेही होते.