पुर्वाच्या काळातले राज्यकर्ते वेश बदलुन राज्यात प्रजेचे हालहवाल जाणण्यासाठी फेरफटका मारायचे असे अनेकदा वाचनात येते. ( अलिकडॆ एकदा जनाब अंतुले व कै.प्रमोद नवलकर )
कधीतरी राज्यकर्त्यांनी रात्री आझाद मैदानावर फेरी मारावी. कोण, कशासाठी उपोषणाला बसलय ? का बरे ही पिडीत जनता आपल्याला सरकारदरबारी न्याय मिळावा म्हणुन आपली गावातील घरदारे सोडुन येथे मुंबईत येवुन अशी रस्तावर का झोपली आहे ? काय त्यांच्या अडचणी आहेत ? त्यांची शिष्टमंडळे आपल्याला येवुन भेटण्याऐवजी आपणच त्यांना जावुन भेटलो तर ? किंवा नुसत्या भावनांच्यावर राजकारण करत रहाण्याऐवजी आपल्या माणसांकरवी त्यांची विचारपुस केली तर, त्यांचे बायकामुलासह येथे येणॆ, रहाणे सुसह्य व्हावे यासाठी काही मदत केली तर.
No comments:
Post a Comment