Tuesday, December 01, 2009

कधी कधी - बहारे हमको ढुंडॆगी ना जाने हम कहां होंगे ....

कधी कधी वाटायचे मरण कसे यावे, शांतपणे , गाढ झोपेत. नकळत, आत्ता या दुनियेत आहोत तर मधेच केव्हातरी नसावे.

पण आता वाटते ते जागेपणी यावे, शांतपणे , उशाशी लता असावी, स्वर्गीय स्वर ऐकत ऐकत गात्र शिथील होत जावी, समाधानाने निरोप घ्यावा.http://www.youtube.com/watch?v=vBaV-KgfVnw - http://www.youtube.com/user/sdongaonkar मधुन साभार

1 comment:

क्रान्ति said...

खूप अप्रतिम गाणं आहे हे. मला पण हे गाणं ऐकलं की असंच काहीसं वाटत रहातं!