आज असे काय घडले ज्यामुळे राजाभाऊंच्या हाती औचीत्यभंगाचा प्रमाद झाला. समोर चाललेला पुरीया धनश्री ऐकायचा सोडुन ते दुसऱ्यांना डिस्टब करत "त्या" ओळख करुन दिलेल्या व्यक्तीशी बोलतच राहिले, बोलतच राहिले, बोलतच सुटले.
" हे मेंडोलीन वाजवतात. "
(संपुर्ण जगात केवळ एकच मेंडोलीन वादक ते जाणतात , हो सर्वश्रेष्ठ आहे ( साऱ्या भक्तांना असेच वाटत असते काय ? ) हे वाक्य ओठापर्यंत आलेले त्यांनी थांबवले , उगीच त्यांना वाईट वाटायला नको )
आपण ज्याला भजतो त्यांना भेटणे नशीबी नव्हते पण आज त्यांच्या मुलाशी ओळख झाली हे ही थोडके नसावे.
सज्जाद हुसेनच्या मुलाशी आज राजाभाऊंची ओळख झाली, मग काय त्यांच्या वाणीला बहर आला, ते येवढे उत्तेजीत झाले कि त्यांच्या ओठावर असलेली सज्जादची गाणी देखील त्यांना आठवेना. " सैया आणि फक्त सैया " आठवत राहिले.
होता है कभी कभी ऐसाभी होता है !
2 comments:
आणि नेमका कुणीतरी मायक्रोब्लॉग टाकला असेल...
"पण का ?"
'काय हो गजाभाऊ, गप्पाच मारायच्या असतील तर पूरिया धनाश्रीचा इतका चांगला माहोल खराब करून इतरांचा रसभंग कशाकरता करावा ??'
:)
गुन्हा मान्य. पुरीया धनश्री हा तर माझा अत्यंत आवडीचा राग.
आजुबाजुला तसं कुणी नव्हतं , जरासे भान राखले होते पण काय करु सज्जाद चा दिवाणा जो आहे.
Post a Comment