Sunday, December 13, 2009

पण असे का ?

एक संस्था.

जी केवळ संपुर्ण भारतातील तरुण कलावंतांनाच नव्हे तर अनेक वेळा या भारतीय कला शिकणाऱ्या परदेशी व्यक्‍तींना पण आपली कला सादर करण्यासाठी व्यासपिठ उपलब्ध करुन देण्याचे महान काम गेली अनेक वर्षे सातत्याने करत आली आहे. या संमेलनासाठी ते खुप मेहनत घेतात. प्रतिष्टीत कलावंतांना घेवुन संगीत संमेलन करणे वेगळे व तरुण नव्या पिढीतल्यांसाठी संमेलन आयोजणे वेगळे. आज मोठा झालेला कलावंत आपल्या उमेदवारीच्या काळात या संमेलनात हजेरी लावुन गेलेला असतोच असतो.

पण या संयोजकांना या संमेलनाच्या प्रसिद्धीचे काय वावडॆ आहे  हा प्रश्न राजाभाऊंने नेहमीच छळत आला आहे.  ही संमेलन होतात तरी कधी हे सर्वसामान्यांना कळणे फार अवघड आहे.  वर्तमानपत्रात याच्या जाहिराती देणे जणु महापाप.

या संगीत संमेलनाला  असलेली तुरळक उपस्थिती बघुन वाईट वाटते.  तरी एक बरे झाले या वर्षापासुन ते वर्तमानपत्रात एक छोटेसे प्रेस रिलीज देत आहेत. पण हे किती जणाच्या लक्षात येणार ?

या वर्षाच्या सुरवातीच्या संमेलनात, मुंबई दुरदर्शनच्या मुख्य संचालकांनी आपल्या भाषणात हे संमेलन ते कव्हर करु इच्छीतात हे सांगितले. त्यावर संयोजकांची भुमिका नकारात्मक होती. सरळ सरळ त्यांनी ते  अव्हेरले.  आमची संस्था असे हे सर्व उपक्रम येवढे वर्षे करत आली आहे ,  वगैरे वगैरे गुणगाण  , आम्ही आहोत त्यात समाधानी आहोत, आम्हाला याची गरज नाही आदी.
ते एक गोष्ट विसरतात.

हे संमेलन त्या संयोजकांसाठी नाही, त्या संस्थेसाठी नाही, त्या संयोजकांचे नाही, त्या संस्थेचे नाही.

हे संमेलन आहे ते या सर्व तरुण गुणी कलावंतांचे.  सर्व रसीकांचे.

आम्ही रसीक व हे कलावंत यांच्या मधले ही संस्था एक माध्यम आहे.

या सर्व कलावंतांना    जे Exposure मिळायला हवे ते मिळायलाच हवे, त्यांची कला ( यांची संस्था नव्हे ) ही सर्वांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपुढे पोचायलाच हवी.  जास्त्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला मिळायलाच हवा.

तेव्हा प्लीज हा उपक्रम लोकांपर्यंत पोचवा.

नसत्या भ्रामक समजुतीपायी रसीकांना या दिव्य अनुभवापासुन वंचीत ठेवले जाण्याचे काहीच कारण दिसत नाही.

वर्तमानपत्रात जाहिरात येवु द्या की. कळुनदे ना जास्तीत जास्त लोकांना , किती चांगले चांगले कलावंत मुंबईमधे या निमीत्ते येत आहेत ते. या सर्वांना ऐकण्याची संधी एरवी कुठुन मिळणार ?

1 comment:

प्रशांत said...

१००% सहमत