Friday, December 11, 2009

रात्रीच्या वेळी हायवे वर मोटरसायकल चालवता ....

आपण जर रात्री  हायवे वर मोटरसायकल चालवत असाल तर आपल्याला जास्तच काळजी घ्यायला हवी. शेवटी आपल्या जीवाचा हा प्रश्न आहे. 

Reflector Jacket  अगदी मस्ट. हे वापरायलाच हवे.  या जॅकेट मुळॆ काळोखात तुम्ही पटकन दिसुन येता.

हेल्मेट - याला तर हाय वे वर पर्याय नाही. दुर्दैवाने अपघात झाला तर शेवटी फुटणारे डोके तुमचेच असणार आहे , ते वाचवायलाच हवे.

आणि मोबाईल , तुम्हाला काय डायरेक्ट चित्रगुप्ताशी बोलण्याची इच्छा आहे काय ?


कोणत्याही परिस्थितीत रस्ताच्या उजव्या बाजुलाच काय पण मध्यभागी देखिल येवु नका. डाव्या बाजुला, रस्ताच्या कडॆने आपल्या मार्गाने सेफ चालवा. एक हलकासा धक्का, एक हवेचा झोका देखिल तुम्हाला इजा करायला पुरेसा आहे. शेवटी तुम्ही चारी बाजुने धोक्यासाठी उघडॆ असता हे ध्यानी राहुन देत.  बाजुने भरधाव वेगात जाणाऱ्या मोठ्या वहानांनी आपल्याला कधी वाचवले असते हे आपल्याला कळत देखिल नाही.  मोठी वहाने चालवणाऱ्याच ते ठावुक. मृत्यू नकाळत हुलकावणी देवुन गेलेला असतो.

रात्रीच्या वेळी उलट्या दिशेने हमरस्तावर मोटरसायकल चालवणे, मधेच कुठेही रस्ता ओलांडणॆ, वळणॆ महापाप. जीवाशी खेळ.

आणि वेगावर नियंत्रण तर हवेच हवे.

आणि मागे बसणाऱ्या बायांनो , मुलींनो,  तुमचा दुप्पटा, ओढणी आणि बुरखा आवरुन बसा.  कधी तो चाकात अडकुन गळफास बसेल कळायचे नाही.

तेव्हा ,

BE SAFE.

No comments: