काल पाहिलेला , फ्रान्सच्या लोकांनी केलेला " प्लान बी " कार्यक्रम राजाभाऊंना एवढा भावला की ते आज परत तोच कार्यक्रम पहायला गेले.
एक तर जमशेदजी भाभा ऑडीटोरीयम , त्यात तो "Page 3 Crowd ", तो माहोल.
काही दिवसापुर्वी एक कार्टुन चॅनल त्यांनी लहान मुले ते पहाण्याचा अतिरेक करतात म्हणुन प्रतिकात्मक काही तासा साठी बंद ठेवले होते.
आज वर्तमानपत्रात एक संपुर्ण दिवस टी.व्ही. संच मालिका बघण्याच्या अतिरेकापासुन मुक्तता मिळवण्यासाठी बंद ठेवा असे काहीसे वाचले.
आता एखादा दिवस तरी मोबाईल घरी बंद करुन ठेवा या साठी मोहीम सुरु करायला हवी.
बाजुला एक लाडवलेला माणुस बसला होता, समोर चाललेला एवढा मस्त कार्यक्रम पहायचा सोडुन मधेच मोबाईल वर मेसेज टाइप करुन राहिला
प्रेक्षकात अंधार होता, फक्त रंगमंचावर छायाप्रकाशाचा खेळ .
ह्या साहेबांच्या मोबाइलचा उजेड मधे मधे फार छळत राहिलेला.
No comments:
Post a Comment