Saturday, December 12, 2009

स्वामी हरीदास संगीत संमेलन - दिवस पहिला

पखावज.

एक भारदस्त वाद्य. राजाभाऊंचे परमप्रिय वाद्य. आज या संमेलनाची सुरवात त्यानेच झाली. जणु शुभशकुनच.

पखावज ऐकणॆ व त्यातुनही पखावज कचेरी मधे ,जेव्हा का आठ आठ पखावज एकाच वेळी बोलु लागतात तेव्हा, या सारखे दुसरे सुख नाही.

दिल्लीस्थित पं. दालचंद शर्माजी व त्यांचे शिष्य लातुरचे श्री. गोपाल जाधव .
3 comments:

naniwadekar said...

पखावज हे साथीसाठी धृपदात तर वापरतातच, पण इतर शास्त्रीय संगीतप्रकारातही पहिली कृती पखावजाबरोबर, आणि त्या वाद्याला शोभणारे 'तिट कत गदि गिन' सारखे बोल जास्त प्रमाणात असलेल्या तेवरा, सूलताल, चौताल, धमार यांपैकी कुठल्यातरी तालांत, सादर करण्याची प्रथा होती. ती अनेक कारणांमुळे नष्टप्राय झालेली आहे. पखावजवादकांची संख्या रोडावली, त्या तालांत धृपद न शिकलेले नवे कलाकार पारंगत नव्हते, ५-१० मिनिटांसाठी वेगळं वाद्य आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, इत्यादि.

पण अज़ूनही काही तालप्रभू, परंपराप्रिय कलाकार या प्रथेची आठवण ज़ागी ठेवतात. रवि शंकर कधीकधी पहिले सतारीवर धृपद अंगाचा प्रकार पखावाजाबरोबर वाज़वत, हे मी एका मैफ़िलीच्या वर्णनाद्वारा वाचलं आहे. अशा प्रसंगी ते या प्रथेचा उल्लेखही करत. सगळ्यांना अनुभवता येईल असा या प्रथेचा वापर के जी गिंडे यांच्या मल्हारच्या स्वरुपांच्या प्रात्यक्षिकात (lec-dem) आहे. अज़ूनही र्‍हिदम हाउसमधे कॅसेट किंवा सी डी वर हा कार्यक्रम मिळत असेल. गिंडे यात अगदीच माफक बोलले आहेत, पण रागांची अनेक अनवट रूपं हाताळली आहेत. या विषयात त्यांचा अधिकार खूप मोठा होता. गौड मल्हारातला नेहमीच्या वापरातला एक स्वर वर्ज्य केलेली बंदिश, एक स्वर पार गाळलेली दुसरी बंदिश असा प्रकार आहे. खूपच छान प्रात्यक्षिक आहे. त्यातली पहिली बंदिश गिंडे यांनी प्रकाश शेजवल (कै अर्जुनजींचे चिरंजीव) यांच्या पखावजाची साथ घेउन गायली आहे.

- डी एन

HAREKRISHNAJI said...

डी.एन.

सुर सिंगार संसद आयोजेत कल के कलाकार व स्वामी हरीदास संमेलनात पखावज खुप ऐकायला मिळतो.

धॄपद महोत्सवात ही मी बऱ्यापैकी ऐकले आहे.

दुर्दैवाने मला काहीही कळत नाही आणि जाणुन घेण्याचाही मी प्रयत्न केलेला नाही. माझ्या घरात तबला, संवादीनी ही वाद्ये तर होतीच. वडिलांचे काका अनेक वाद्ये वाजवायचे.

त्यात आमच्या घरी अनेक वर्षे दोन ऑर्केस्टांवाले सराव करण्यसाठी यायचे. सर्व वाद्ये घरीच असायची. पण नाही जमले कधीच.

पं. बबनराव हळादणाकरांचा मुलगा माझा जिवलग शाळासोबती , त्यांच्या घरी माझे जाणे येण होते.

कोरडा ते कोरडाच राहीलो.

Anonymous said...

ताल ओळखणं कठीण नाही, ते वज़नही कळतं, पण मला बोल कळत नाहीत. चर्मवाद्य शिकलेल्यांतही बोल ओळखू येणारे कमीच असतात.

माझा एक तबला वाज़वणारा मित्र पखावजाच्या अनुपस्थितीत अगदीच नाईलाज़ झाला तर साथ करतो. त्यासाठी तबल्यावर कसा हलका, दबका हात टाकतात हे त्यानी एकदा मला दाखवलं होतं. पण तालवाद्यांची अशी अदलाबदल न केलेली बरी असते. कारण तबला तो तबला, आणि पखावज तो पखावज, आणि दक्षिणेकडचा मृदंगम्‌ स्वत:चा खास बाज़ ठेऊन असतो.

- डी एन