Thursday, December 17, 2009

ओडीसी संगीत - स्वामी हरीदास संगीत संमेलन. दिवस पाचवा.काय हो राजाभाऊ, तब्येत तर ठीक आहे ना, आता पर्यंत हिंदुस्थानी संगीत व कर्नाटकी संगीताबद्द्ल ऐकले होते, पण हे नवीनच ओडीसी संगीत कुठुन आले ?


अहो तुम्ही भुवनेश्वर वरुन आलेल्या श्रीमती संगीता गौसेन यांचे गाणे ऐकले असते ना तर तुम्हाला कळाले असते हा काय प्रकार आहे तो, नेमके दोन्ही कॅमेरे आजच मोडायचे होते, नाहीतर तुम्हाला ऐकवले असते किती माधुर्य होते या गाण्यामधे ते.

आणि काय हो राजाभाऊ,  आतापर्यंत तुमचा झालेला आणखीन एक गैरसमज दुर झाला असेल ना. वाटत होते धृपद संगीत भारतातील  फक्‍त काही भागापुरते सीमीत आहे पण कोलकतावरुन आलेल्या श्रीमती रंजीता मुखर्जी व त्यांच्यानंतर झालेल्या श्री. दुर्गा शंकर अचीर्जी यांच्या गाण्यानी दुर झाला असेल ना.

हो ना.

आज वेळॆ अभावे दोन चांगले कार्यक्रम हुकले.

भुवनेश्वरच्या गुरु सचीनानंद दास यांचे मरडल वादन व कलकत्ताच्या बुद्धदेव मन्ना व लातुरचे श्री. गोपाळ जाधव यांचे तबल व पखवज याची जुगलबंदी.

No comments: