Sunday, December 20, 2009

स्वामी हरीदास संमेलन - दिवस नववा.

एकीकडॆ झाकीर हुसेन आणि कं. यांच्या कार्यक्रमाचा पास मिळाला आहे आणि त्याच वेळी दुसरीकडॆ देशभरातुन आलेल्या नवोदीत, गुणी तरूण कलावंत "स्वामी हरीदास संगीत संमेलन मधे आपली कला सादर करत आहेत.

अश्यावेळी  राजाभाऊंनी कोणाला प्राधान्य दिले असेल ?

आपले नेते प्रांतीयपणा वरुन राजकारण करत, लोकांच्या भावनांशी खेळत, भडकवत स्वःताच कार्यभाग साधुन घेत असतात, त्याच वेळी कलेच्या प्रांगणात कलकत्ताचा राहुलदेव मोंडल मुंबईमधे दक्षिणेकडचे भरतनाट्यम सादर करण्यासाठी येत असतो.

आजचा दिवस गाजवला तो राहुलदेव नी.  अंग लवचीक असावे तरी किती. त्यानी म्हणण्यापेक्षा आज जणु प्रत्यक्ष शिवानेच रंगमंचावर त्याच्या रुपाने येवुन  शिव तांडव सादर केले असे म्हटले तर ती अतिशोयक्ती ठरु नये. 

त्याच्या आधी दिल्लीवरुन आलेल्या मोमीता घोषनी ओडीसी नृत्य सादर केले होते. ते पहाण्यासाठी राजाभाऊ आज पुण्याहुन खुप लवकर निघाले, पण . हुकायचे ते हुकलेच.

मग गोरखपुर वरुन आलेल्या सुजया घोष व वाराणशी वरुन आलेल्या स्वेता चौधरी यांचे कथ्थक नृत्य झाले.नंतरचे कार्यक्रम बघण्यासाठी आज राजाभाऊंकडॆ एनर्जी शिल्लक रहिली नव्हती.

खर तर त्यांनी शेवट पर्यंत थांबायचे होते.

आता प्रतिक्षा उद्याची.

No comments: