Tuesday, December 15, 2009

वाईट फारच वाईट
कोलकता व अमेरिकस्थीत पं. देबी प्रसाद चटर्जी आपला सतारवादनाचा कार्यक्रम करायला मुद्दामुन अमेरीकावरुन मुंबईत आले आणि हा मुंबईनी त्यांना दिलेला थंडा प्रतिसाद.

चुकी कोणची ?

हा महोत्सव लोकांपर्यंत पोचतच नाही. दर वेळेची तीच रड.  दुरदुरच्या प्रदेशातुन आलेल्या सर्व  कलावंतांना रिकाम्या खुर्चींपुढे आपली कला पेश करायला लागते याचे राजाभाऊंनी फार दुःख होते.  किती हौशेनी हे सर्व जण मुंबईत येत असतील

 कलावंताना काहीतरी रसीकांना सांगायचे असते , आपल्या भावना या संगीताद्वारे समोर असलेल्या श्रोत्यांपर्यंत पोचवायच्या असतात, कलेमधुन आपल्याला जो आनंद मिळातो तो त्यांना वाटायचा असतो, या द्वारे मिळणाऱ्या आंतरीक समाधानामधे त्यांना कोणालातरी सामील करुन घ्यायचे असते. त्यांची कला ही जशी त्यांच्यासाठी असते त्यांच्यापेक्षा जास्त ती रसिकांसाठी असते.

पण. समोर कोणीच नसेल तर ?

हे सारे दुःख मनाशी घेत कार्यक्रमाचा आस्वाद घेणे फार कठीण जाते.

या मैफिलीत पंडीतजींनी राग चारुकेशी वाजवला . त्यांनी अप्रतिम साथ केली पं.मदन मिश्रा यांनी.

बहार आली.

ही बहार सर्वांपर्यंत पोचावी असे राहुन राहुन वाटते.

1 comment:

VENNILLA said...

Hi.. Could u pl add me in ur blogroll..