Sunday, December 13, 2009

कधी तरी ..

ही तरुणी कोण आहे ? हि जर आपली बायको तर मग आत्ता आपल्या घरात वावरत आहे ती कोण ?

हा तरुण ओळखीचा वाटतोय, चिकनाचोपडा, बारीक सडपातळ , सपाट पोट, डोक्यावर भरपुर केस.

काय मजा केली होती ना आपण तेथे. काय मस्त ठिकाण आहे, आपण परत तेथे जाणार होतो.

आणि तुला सांगतो , तु पहिल्यांदाच माझ्यावर ही अशी रुसुन फुरंगटुन बसली होतीस ना मी तेव्हा ..
आणि ही आपली पहिली दिवाळी ..

हा पहिल्यांदा रांगायला लागला तेव्हा, हे याचे पहिले पाऊल, हा एक वर्षाचा झाला. केवढुस्सा होता , आता नुसता लांबलच्चक झालाय.

केव्हा तरी आपले जुन्या जमान्यातले सर्व फोटो बाहेर काढुन जवळ बसुन एकत्रीतरित्या त्याचा आस्वाद घ्यावा.

No comments: