Saturday, December 05, 2009

ते लक्ष ठेवुन आहेत .Mackenna's Gold चित्रपटात सोन्याची खाण मिळण्याच्या आदल्या रात्रीचा प्रसंग आहे. तो रेड इंडियन सुर्य केव्हा उगवतो याची प्रतिक्षा करत रात्रभर आकाशाकडे एकटक डोळे लावुन बसलेला.

तसच रात्रभर राजाभाऊ प्रतिक्षा करत बसले , पहाट केव्हा उगवते आणि आपण "ते"  चे फोटो काढायला केव्हा जातो याची.

पण सुर्यदेवतेने त्यांची आज निराशा केली.  ढगाळ वातावरण आणि त्यात पश्चिम दिशेकडॆ असणारे "ते" .

पण त्यांना आज जरी आकाशातला सुर्य दिसला नाही तरी मात्र त्याचे दर्शन झाले, अगदी रथात आरुढ होवुन "अरुण" भ्रमण करतांना. 

आणि त्याचे स्वागत करणारे "हे"
No comments: