Tuesday, December 22, 2009

स्वामी हरीदास संगीत संमेलन -दिवस ११ वा


एखादा दिवस असा येतो की जो तुम्हाला उत्तम, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ट कलाकृती देवुन जातो, डोळ्याचे पारणे फिटते, एक आगळे समाधान देवुन जातो.

वैभव आरेकर व केतकी जोशी यांनी सादर केलेले भरतनाट्यम, दशावतार. असे पुन्हा होणे नाही.

आतापर्यंत ओडीसी नृत्य व्यवस्थीत पहायला मिळालेच नव्हते, ती कसर आज भुवनेश्वरच्या स्मॄतीरेखा त्रिपाठी यांनी भरुन काढली, अप्रतिम, केवळ हाच शब्द.

हे दोन कार्यक्रम बघुन झाल्यानंतर आता कथ्थक नेहमीचेच, ते काय बघायचे (क्षमा असावी ), चला निघुया असा राजाभाऊंने विचार केला. पण पाहु तरी कोण आहे म्हणता म्हणता, ते खुर्चीला खिळुन राहिले. जबलपुर वरुन आलेल्या वैषाली पाटील यांनी तर कमाल केली.  वा , क्या बात है.















4 comments:

साधक said...

सुंदर. तुम्ही हे सारं जगभर पोचवता हे खूप आहे.

HAREKRISHNAJI said...

एका गोष्टीचे फार वाईट वाटते, संयोजक या संमेलनासाठी एवढी मेहनत घेतात, पण एक साधी जाहीरात देवुन ते लोकांपर्यंत पोचवत नाहीत.

Gouri said...

tumacha aata hevaa vatayalaa lagalay :)

tumhalaa dhanyavaad dyaayalaa havet ... itake sundar kaaryakram tumhi anubhavata aahat aani amachyaparyant pohochavata aahat mhanoon.

HAREKRISHNAJI said...

गौरीजी,

नेमके माझे दोन्ही कॅमेरा माझ्या हातुन मोडले आहेत. त्यामुळे फोटो फार वाईट येत आहेत आणि मला जर समोर नक्की काय चालले आहे हे कळले असते तर मग ते नेमकेपणानी मांडता आले असते.

शास्त्रीय संगीत व नृत्य माझ्यासाठी "काला अक्षर भैस बराबर " सारखे आहेत.

मला ते कळतही नाही व वळतही नाही.

पण एक मात्र नक्की मला या तरुण , गुणी कलावंतांचे खुप कौतुक आहे