Tuesday, December 08, 2009

कधी तरी


कधी तरी टोपणनावांने लिहिणाऱ्याला मग त्या नावाचा कंटाळा येत असेल का ? आपले खरे नाव आता समोर यावे , त्याच नावाने आपण लिहावे असे वाटत असेल का ?

बिझी बी, तंबी दुराई, ब्रिटीश नंदी. काही काळानंतर मग त्यांचा खरा चेहरा समोर येतो. वाटते ही लोक एखादे टोपण नाव घेतांना काय विचार करुन ते निवडत असावे ?

11 comments:

शिरीष said...

त्याला टोपणनांव म्हणतात ह्यातच तो प्रश्न आणि ते उत्तर दडले आहे.

Gouri said...

yaalaa kalpanaashakteechaa aabhaav mhanaayache kaa ajoon kaahi te mahit naahi - pan lihitaana kimva generally online forums madhyehi topan naav vaaparane kadhich jamale nahi. tyaamule malaa deergh kaal topan naav vaaparoon vaavaranaaryaa lokaanvishayi ek aadar aahe :)

Mahendra said...

टोपण नांव घेण्याचा उद्देश असतो, की आपण काहिही लिहिलं तरीही त्यावर कोणाला काही एक्स्प्लनेशन द्यायची वेळ येत नाही. अगदी काय वाट्टेल ते लिहिलं तरीही..
जेंव्हा तंबी राज ठाकरेंवर टिका करतो, तेंव्हा राजचे गुर्गे जर खरं नांव कळलं तर घरच्या लोकांना त्रास देतिल ही भिती असतेच .. म्हणुन टोपण नाव घेतलेल्यांना आपलं कधीच खरं नाव इतरांना कळावंसं वाटणार नाही !

HAREKRISHNAJI said...

खर सांगायचे म्हणजे मलाच "हरेकृष्णाजी " या टोपणनावाने लिहिण्याचा कंटाळा येत चालला आहे

प्रसाद साळुंखे said...

खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे, तसं पाळण्यातले वेगळे आणि वापरातले वेगळे असं असावं, हटके नावं लक्षात राहतात मग साहित्याच्या दर्जाकडे वाचकांचा कानाडोळा व्हायला पुरता वाव असतो. लोकांना चिवित्र गोष्टी आवडतात, त्या त्यांना हटके वाटतात. कदाचित लेखन करताना मी कोणीतरी वेगळाच असतो, मग नाव का वेगळं असू नये? असं वाटत असावं. मी साजन सिनेमा पाहिला मग टोपणनावाचा वेगळा फायदा कळला.

भानस said...

Harekrishnaji मला कुठेतरी अंधूक हाच अंदाज होता.:) मात्र कधीकधी नाईलाजही असतो...जसा माझा झाला....:(

D D said...

मी साडेतीन वर्षांपूर्वी याहू ३६० वर माझं अकाऊंट ओपन केलं होतं, तेव्हा सोशल वेबसाईट्स म्हणजे नेमकं काय हेच माहीत नव्हतं, त्या वेबसाईटवर कसा अनुभव येईल या भीतीमिश्रीत कुतुहलाने अकाऊंटला टोपण नाव दिलं होतं. आणि याहू ३६० बंद होईपर्यंत तरी मला त्या टोपणनावाचा कंटाळा आला नव्हता.

अपर्णा said...

हरेकृष्णजी...आता खरं नाव होऊनच जाउदे....:)

HAREKRISHNAJI said...

चुरापाव , महेंद्रा, शिरीष.

खर आहे. मला नेहमे प्रश्न पडतो की टोपणनावाने लिहिणाऱ्याला नेमके आता आपण आपला चेहरा समोर आणावा असे केव्हा वाटायला लागते ?

HAREKRISHNAJI said...

भानस ,

हो ना.

D D .

माझे देखिल तसेच झाले. याहु नवीन सुरु झाले तेव्हा काय, कसे, का ? कशाचीच फारसी माहिती नव्हती. मग त्यावेळी कदाचीत Iscon मधे जेवायला गेल्याची आठवण ताजी असल्याने "हरेकृष्णा " निवडले पण ते उपल्ब्ध नसल्यामुळॆ पुढे "जी" जोडले.

अपर्णा,

तर हा असा "हरेकृष्णाजी" झाला.

HAREKRISHNAJI said...

भानस ,

हो ना.

D D .

माझे देखिल तसेच झाले. याहु नवीन सुरु झाले तेव्हा काय, कसे, का ? कशाचीच फारसी माहिती नव्हती. मग त्यावेळी कदाचीत Iscon मधे जेवायला गेल्याची आठवण ताजी असल्याने "हरेकृष्णा " निवडले पण ते उपल्ब्ध नसल्यामुळॆ पुढे "जी" जोडले.

अपर्णा,

तर हा असा "हरेकृष्णाजी" झाला.