कडाक्याच्या थंडीचे दिवस. मध्यरात्री रेल्वे स्थानकावर ट्रेन पोहोचते, बाहेर त्या गाडीला जोडुन असलेल्या राज्यपरीवहान मंडळाची, शेवटची बस पकडण्यासाठी तुम्ही जीवाचा आटापीटा करता. धावत जावुन ती बस पकडता. बस मधे शिरणारे तुम्हीच पहिले. मनासारखी सिट पकडता, मागुन धाडधाड सर्व माणसे बसमधे चढत जातात, एक दोन मिनिटात बस जॅम पॅक होते, उभे रहायला पण हात हलवायलापण इंचभर जागा नसते.
तुम्ही तुमच्या जागा पकडण्याच्या कौश्यल्यावर खुष होतात. इतरांची जरासी कीव करता.
बस सुरु होते, वेग घेते. बाहेरचा ठंडगार , बोचरा, गार वारा सहन होईनासा होतो.
तुम्ही खिडकी बंद करायला जातात.
नेमकी त्याच खिडकीला काच नसते. तुमचे गरम कपडे बॅगेत. बॅगेकडे पोचणे अशक्य.
साऱ्या प्रवासात तुमची कुल्फी झालेले असते.
4 comments:
its just not your day :)
आणि असे आपले नसलेले दिवसच मेले अमंळ जास्तच....:(
छान लिहिलंय. असं होतं खरं कधी कधी. गौरी म्हणते ते खरं आहे. तो दिवस तुमचा नसतो.
या अश्या बोचऱ्या थंडीची सवय तशी ट्रेकला गेल्यावर किंवा रात्री आकाशदर्शनाच्या कार्यक्रमात आहे.
पण तो इतिहास होत चालला आहे.
Post a Comment