Sunday, December 06, 2009

मुंबईमधे सर्व उपहारगृहात मराठी भोजन मिळालेच पाहीजे (अगदी कोहीनुरमधे सुद्धा )





मुंबईमधे सर्व उपहारगृहात मराठी भोजन मिळालेच पाहीजे (अगदी कोहीनुरमधे सुद्धा )

ठाकुरद्वारी तांबे, श्रुधाशांती, गिरगावात कोल्हापुरी चिवडा, दादरला तॄप्ती . बस्स यादी संपली. एका हाताच्या बोटावर मोजता येइल येवढ्याच उपहारगॄहात महाराष्ट्रीय भोजन , थाळी मिळते.

("दिवा महाराष्ट्राचा " मधेही बहुधा मिळत असावी. पण येथे जेवायल्या गेल्यानंतर खिसापाकीटात "मशाल" पेटायची करुन राजाभाऊ अद्यापी गेलेले नाहीत. )

जर का उपहागॄहात मराठी भोजन मिळाले नाही तर राजाभाऊ त्या उपहारगृहावर बहिष्कार घालतील, तेथे ते .
जेवायला जाणार नाहीत असा सज्जाड दम ते सर्वांना भरत आहेत ..

2 comments:

Unknown said...

i agree with you.

HAREKRISHNAJI said...

ही खरच दुर्दैवी गोष्ट आहे.

काल रस्तात एका जोडप्याला "येथे Authenticate Maharashtrian Food " कुठे मिळेल हे एका दुकानदाराला विचारतांना मी ऐकले. तो दुकानदार त्यांना नीट सांगु शकला नाही. मग मी त्यांना तांबेंकडे पाठवले.